धाराशिव – समय सारथी
महायुतीच्या सर्व घटक पक्षाचा 14 जानेवारी रोजी धाराशिव येथे एकत्रीत मेळावा स्वस्तिक मंगल कार्यालय येथे होणार असल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. यावेळी सुरेश बिराजदार, जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, सुरज साळुंके, नितीन काळे, नेताजी पाटील, महेंद्र धुरगुडे, दत्ता साळुंके, मयुर काकडे, राजाभाऊ ओव्हाळ, प्रवीण पाठक आदी उपस्थितीत होते.
जे जे लोक स्वतः महायुतीमध्ये येण्यास इच्छुक आहेत त्यांना प्रवेश देऊन सामावून घ्यायची आमची तयारी असल्याचे आमदार चौगुले यांनी सांगितले. 2024 च्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त करीत सर्वांनी विजयाचा संकल्प केला. महायुतीत जागा कोणाला सोडायची व उमेदवार कोण हे सर्व पक्षाचे पक्षश्रेष्टी एकत्रीत निर्णय घेऊन ठरवतील असे सांगितले.
राज्य पातळीवरील नेते एकत्र असुन स्थानिक पातळीवर समन्व्य राहावा यासाठी हा मेळावा होणार आहे. गेल्या दीड वर्षात मोठा निधी व न्याय मिळाला, अनेक योजना मंजुर झाल्या, ही गती आणखी वाढवण्याचा संकल्प असल्याचे आमदार पाटील म्हणाले. धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी ही आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले व सुरेश बिराजदार यांच्यावर असणार आहे असे आमदार चौगुले यांनी सांगितले.
जिल्हा पातळीवर समन्व्य समिती असेल दर आठवड्याला या समन्व्य समितीची बैठक होईल, जिल्हा मेळावे झाल्यावर तालुका व बूथ पातळीवर मेळावे होतील. जिल्हा पातळीवर समन्व्य दत्ता साळुंके, राष्ट्रवादीकडुन सुरेश बिराजदार, प्रहार मयुर काकडे, रीपाई राजाभाऊ ओव्हाळ,भाजप कडुन नितीन काळे हे समन्वय समितीत राहतील.