पोलीस कोठडी – 1 लाखांची लाच प्रकरण, सरपंच पती हनुमंत कोलते यांना कोठडी
धाराशिव – समय सारथी
1 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सरपंच पती हनुमंत कोलते यांना धाराशिव न्यायालयाने 27 मार्चपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यांना काल अटक केल्यानंतर आज धाराशिव येथे कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली त्यावर युक्तीवादानंतर न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे हे स्वतः कोर्टात हजर होते.
पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या जलजीवन मिशनचे काम करू देण्यासाठी कोलते यांनी लाच घेतली, सरपंच पत्नीचा त्यांनी गैरफायदा घेऊन लाच घेतली.
परंडा तालुक्यातील रोहकल या गावात तीन जलजीवन योजनेच्या साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य द्या अशी लाच मागितली व 1 लाख रुपये घेताना अटक केली आहे.
तक्रारदार हे मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनी मध्ये साईड सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे काम रोहकल गावातील 3 वस्तीवर चालू असून यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करू देण्यासाठी यातील तक्रारदार यांना 22 मार्च रोजी चालू असलेल्या तीन साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अश्या लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोडी अंती 1 लाख लाच घेतली.
पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांनी मार्गदर्शन केले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांनी काम पहिले.