मुंबई – समय सारथी
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता व शिवसेना कोणाची हा ऐतीहासिक निकाल जाहीर केला. त्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व दोन्ही बाजूच्या वकिलांचे आभार मानले.
केंद्रीय निवडणुक आयोगाकडे असलेली 2018 मधील शिवसेना पक्षाची घटना व त्यात झालेले बदल लक्षात घेतले. दोन्ही गटाने वेगवेगळ्या शिवसेना पक्षाच्या घटना दिल्या त्याचबरोबर निवडणुक आयोगाकडे असलेली घटना गृहीत धरली. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या घटनेवर सुद्धा तारीख उल्लेख नव्हता, त्यामुळे ती घटना मान्य केली नाही. ठाकरे यांनी 2018 साली केलेली दुरुस्ती मान्य केली नाही. ठाकरे हे उलटतपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करण्यात आले. 2018 साली निवडणूक आयोगाने दिलेली पक्षातील रचना मान्य केली.
10 व्या सुचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व पाहायचे आहे असे सांगत नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख व आमदार अपात्रता बाबत निर्णय दिला. शिवसेना पक्षप्रमुख हे गटनेत्याला व इतरांना पदावरून काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करता येणार नाही, ते अधिकार एकट्या ठाकरे यांना नाहीत असे सांगितले.