मराठा आरक्षण – धाराशिवमध्ये तरुणाने पेटवली स्वतःची गाडी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या एका मराठा युवकाने स्वतःची स्कुटी पेटवत आरक्षण मिळत नसल्याने राग व्यक्त केला.
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या एका मराठा शेतकरी युवकांने स्वतःची स्कुटी पेटवून राज्य शासनाचा निषेध केला. पंकज महादेव बरडे या युवकांने गावातील उजनी धाराशिव रस्त्यावर स्वतःची स्कुटी पेटवून निषेध केला. यामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पेटवलेली दुचाकी विजवली.
धाराशिव येथे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होत असून त्यात आमरण उपोषण,रास्ता रोको केला जात आहे.