आरोग्याचा हक्क कायदा आणणार – व्यसनाच्या आहरी न जाता लढा
धाराशिव – समय सारथी
स्पर्धेच्या युगात सध्या तरुणाई नैराश्याकडे जात आहे. युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षा अपयश, शिक्षण, व्यवसाय यात अपयश आले की तरुणाईला एकच तोडगा दिसतो, तो म्हणजे परमिट रूम व बिअर बार.. म्हणून मी आरोग्य विभागाला आवाहन करतो की आरोग्य विभागाने ज्या ज्या ठिकाणी परमिट रूम व बिअर बार आहेत त्या ठिकाणी आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे असे बोर्ड लावावेत असे सांगत आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी नवीन संकल्पना मांडली. संकल्पना मांडत आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी व्यसनमुक्तीबाबत एक मोहीमच उघडली आहे.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 50 खाटाचे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते त्यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एस एल हरिदास यांच्यासह अधिकारी उपस्थितीत होते. ठेकेदाराने वेळेत काम पुर्ण केले तर स्वतः त्याला 5 लाख बक्षिस लवकर रुग्णसेवा दिल्याने देऊ असे जाहीर केले.
तरुणाई महाराष्ट्राचे वैभव आहेत त्यामुळे व्यसनाच्या आहरी जाऊ नये. अपयश ही यशाची पहिली पायरी, ज्याला पाचवता येते तो यशाच्या सर्वोच्च शिखरावर जातो, जो अपयशी होतो तो व्यसनाच्या मार्गांवर जात आहरी जातो त्यामुळे तरुणांनो अपयश आल्यावर खचून जाऊ नका, आपण लढाई जिंकू शकतो हे कायम मनात ठेवा व लढा त्यानंतर यश नक्की मिळते.
आपण हरतो ही मानसिकता बदलली तर यश मिळते. जेव्हा आपण मनापासून लढतो तेव्हा आपले कर्म व प्रारब्ध साथ देते असे सांगत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे ही संकल्पना मांडली, प्रत्येक ठिकाणी बिअर बार समोर असे बोर्ड लावा असे आवाहन केले.
येत्या अधिवेशनात राईट टू हेअल्थ म्हणजे आरोग्याचा हक्क हा कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात सुद्धा आपण सत्तेत असणार आहोत मात्र खाते कोणते हे सांगता येत नाही त्यामुळे जाता जाता हे आरोग्य खाते असताना महाराष्ट्रमधील 12 कोटी 50 लाख जनतेला आरोग्याचा अधिकार हा कायदा देणार असे त्यांनी सांगितले.
दीड वर्षात उपक्रम राबविले गेले, पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीने बदली उपक्रम राबवीला गेला. येत्या महिना अखेर पर्यंत आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पार पडेल यात कोणताही वाद, अनागोंदी,भ्रष्टाचार झाला नाही तो चालणार सुद्धा नाही. इतके वर्ष आरोग्य खाते कागदावर होते मात्र आता प्रत्यक्षात काम दिसत आहे, आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे यात मोठे योगदान आहे असे सांगत त्यांचे कौतुक केले.