6 लाख लाचेची मागणी – धाराशिव लाचपुचपत विभागाची मोठी कारवाई, ओळख बदलतेय
धाराशिव – समय सारथी
सहायक नगर रचनाकार मयुर केंद्रे यांना लाच लुचपत विभागाने लाच घेल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. 6 लाख मागणी करुन 5 लाख रक्कम देण्याचे ठरले त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये घेताना केंद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. सिंदफळ शिवारातील 3 एकर शेतजामीन अकृषी करण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते महेंद्र धूरगुडे यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी ही कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विशाल डोके,सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य यांनी काम पहिले.
लाचलुचपत कारवाईचा म्हेत्रे पॅटर्न –
धाराशिव लाचलुचपत विभागाची या मार्च महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. पोलीस उप अधीक्षक सिद्धराम म्हेत्रे हे 10 मार्चला रुजू झाल्यानंतर ही तिसरी मोठी कारवाई आहे. जिल्ह्यात कारवाईचा म्हेत्रे पॅटर्न तयार होत आहे. विशेष म्हणजे जे ट्रॅप झाले ते लाखाच्या घरातील मोठे ट्रॅप आहेत.
या महिन्यात तिसरी मोठी कारवाई –