धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे 8 ते 10 जानेवारी असे तीन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह आरोग्य संस्थातील विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत. 3 दिवसांच्या दौऱ्यात विविध कामे मार्गी लागणार आहेत.
8 जानेवारी रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आमदार, खासदार यांच्या उपस्थितीतीत जिल्हा नियोजन समितीची बैठक, 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 50 खाटांचे क्रिटिकल केअर युनिट कामाचे भुमीपुजन, दुपारी 3 वाजता परंडा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 100 खाटांचे स्त्री रुग्णालय बांधकामाचे भूमिपूजन करतील त्यानंतर परंडा शहरातील नगर परिषद अंतर्गत 92 कोटी रुपयांच्या विकास कामे व रस्त्याचे भूमिपूजन, सोनारी येथे श्री क्षेत्र भैरवनाथ येथील तीर्थक्षेत्र विकास कामांचे भूमिपूजन व 5.30 वाजता अनाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान भूमिपूजन करुन सोनारी येथे भैरवनाथ कारखान्यात मुक्काम करतील.
9 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी 9.45 वाजता भुम तालुक्यातील वालवड येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय व इतर भूमिपूजन, पाटसांगवी येथे विकास कामांचे भूमिपूजन, गोलेगाव येथे 11.25 वाजता, भुम येथे सकाळी 11.30 वाजता 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भुमीपुजन, नवीन बस स्थानक भुमीपुजन, भुम येथे नगर परिषदेच्या अंतर्गत 114.65 कोटी रुपयांच्या कामांचे भुमीपुजन, दुपारी 1.30 वाजता वाशी व मोहा येथे उपजिल्हा रुग्णालय येथे 50 खाटांचे इमारत भूमिपूजन, कळंब येथे उपजिल्हा रुग्णालय व प्रसूतीगृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन करुन ढोकी येथील भैरवनाथ शुगर येथे भेट व पाहणी करुन धाराशिव येथील शासकीय कार्यालय येथे मुक्काम करतील.
10 जानेवारी रोजी सकाळी बैठका व भेटी घेऊन सकाळी 11.30 वाजता जागजी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी निवास्थान, सारोळा येथे उपकेंद्र भुमीपुजन, वडगाव सिद्धेश्वर, बारूळ, देवसिंगा, दहीवडी व बावी येथे उपकेंद्र भुमीपुजन करुन 4.30 वाजता तुळजाभवानी मातेचे दर्शन करुन पुणे येथे जातील.