धाराशिव –
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असुन याची निमंत्रण पत्रिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी ठेवण्यात आली आहे. आई तुळजाभवानीचे महंत पुजारी यांना देखील या सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
अयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटनाची पत्रिका विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यानी आई तुळजाभवानी चरणी अर्पण केली व महंतानाही विशेष मानसन्मान देत पत्रिका देण्यात आली, यावेळी आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात आई तुळजाभवानी देवीची आरती करून ही पत्रिका देवीचरणी ठेवण्यात आली.
राम मंदिर होणं हा समस्त हिंदू धर्मासाठी व आई तुळजाभवानीच्या भक्त आणि पुजाऱ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याने, या उत्साहाला जाणं व हे निमंत्रण येणे हे भाग्याचे असल्याचे देवीचे महंत तुकोजीबुवा यांनी सांगितले तर देवगिरी प्रांतातील 84 पुजारी व विशेष लोकांना याचे निमंत्रण देण्यात येत असून आई तुळजाभवानीला प्रथम निमंत्रण दिल्याचे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत.