चिंताजनक, धाराशिव जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यासाठी आता एक चिंताजनक बातमी असुन कोरोनाने कळंब तालुक्यातील इटकूर येथील एका 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर येथे उपचार सुरु असताना त्या रुग्णाचा मृत्यू असुन रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गेल्या 5 दिवसात धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचे 29 नवे रुग्ण सापडले असुन आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आहे. चिंता वाढली ही बाब असुन उमरगा तालुक्यात रुग्ण सापडत आहेत.