पक्षप्रवेश, कळंबमध्ये राष्ट्रवादीला धक्का – पालकमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकारातुन मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
धाराशिव – समय सारथी
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. कळंब नगर परिषदेतील प्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असुन 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उप नगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी या पक्ष प्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब-धाराशिव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला सुद्धा धक्का बसला आहे.
माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष आशा सुधीर भवर, यांच्यासह अमर विजय गायकवाड, सुभाष पवार, इंदुमती जय नंदन हौसलमल, साधना कांतीलाल बागरेचा, संगीता महेश पुरी, सफुरा शकील काझी (सर्व माजी उप नगरअध्यक्ष) लक्ष्मण मनोहर कापसे, मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, मुरलीधर भवर, महेश मिठू पुरी, उत्तरेश्वर बळीराम चोंदे, कांतीलाल मोहनलाल बागरेचा सागर सुभाष मुंडे व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी नितीन लांडगे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते
मंत्री सावंत यांच्याशिवाय जिल्ह्याचा विकास कोणीही करू शकत नाही – संजय मुंदडा
डॉ तानाजीराव सावंत यांच्याशिवाय जिल्ह्याचा कोणीही विकास करू शकत नाही, स्वखर्चाने फिरता दवाखाना धाराशिव जिल्ह्यात फिरवणारे व संपूर्ण ताकतीने धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्राचा विकास दृष्टी बाळगणारे नेतृत्व हे सावंत आहेत.सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गतिमान सरकार देणारे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे माजी नगराध्यक्ष मुंदडा यांनी सांगितले.
कळंब नगर परिषदेच्या १७ पैकी ११ नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला तर काल ३ नगरसेवकांनी प्रवेश केला होता. आता १४ हून अधिक माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष हे शिवसेनेत आहेत त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कळंब नगरपालिकेवर फडकेल असा विश्वास मुंदडा यांनी व्यक्त केला.