धाराशिव – समय सारथी
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन धाराशिव जिल्ह्यातील पारधी समाजातील गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणणेकरीता “पहाट” कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पारधी समाजातील गुन्हेगारांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवून देणे त्यांना कायम स्वरुपी उपजिवीकेचे साधन उपलब्ध करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.पहाट या कार्यक्रमाची न्यायालयाकडुन दाखल घेतली असुन पारधी समाजातील आरोपींचे पुर्नवसन करण्याचे निर्देश दिले आहेत
“पहाट” कार्यक्रमाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धाराशिव राजेश गुप्ता साहेब देखील दखल घेत सदर कार्यक्रमाचे कौतुक करुन ढोकी पोलीस ठाणे गु.रं.नं. 369/2022 कलम 399, 402 प्रमाणे दाखल गुन्हृयातील आरोपी दादा उध्दव चव्हाण, वय 35 वर्षे, अनिल उध्दव चव्हण,वय 30 वर्षे, फारुक सत्तार कोतवाल, वय 50 वर्षे, सुनिल उध्दव चव्हण,वय 27 वर्षे, रमेश उध्दव चव्हाण, वय 25 वर्षे सर्व रा. राजेशनगर ढोकी ता. जि. धाराशिव व राहुल तानाजी पवार, वय 21 वर्षे, रा. तेरणा कॉलेज जवळ धाराशिव, अनिल बप्पा काळे, वय 26 वर्षे, शर्मा दादा शिंदे, वय 19 वर्षे, दोघे रा. पळसप दिपक तानाजी पवार, वय 23 वर्षे, रा. तेर यांची न्यायालयाने सदर गुन्ह्याचे सुनावणी अंती पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली,
आरोपीचा गुन्हेगारीचा पुर्वेइतिहास पाहता त्यांना पुढील 3 महिन्या करीता आठवड्याच्या प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे हजेरी लावण्याचे व पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे “पहाट” कार्यक्रमा अंतर्गत त्यांना पुन्हा गुन्हे करणे पासून परावृत्त करण्याकरीता व त्यांचे पुर्नवसन करण्याकरीता त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे निर्देश दिले आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वरील सर्व आरोपीत यांचे समुपदेशन करुन त्यांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून देवून व उपजिवीकेचे साधन उपलब्ध करुन त्यांना मुख्य प्रवाहातआणण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे.