धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेचा आखाडा पेटला असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 जानेवारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार 13 जानेवारीला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्याची तयारी सुरु असुन ते दोघेही आपआपल्या पक्षाचा मेळावा, कार्यकर्ते बैठक घेणार आहेत. शिंदे यांचा मेळावा धाराशिव शहरात आहे तर उपमुख्यमंत्री पवार यांचा मेळावा बाबत नियोजन सुरु आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला असुन कोणत्याही स्तिथीत जागा देणार नाही असे सांगितले तर भाजप व अजित पवार गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे त्यामुळे जागेसाठी रस्सीखेच होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जानेवारी रोजी धाराशिव शहरात येणार आहेत. पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्यात पदाधिकारी बैठक, भव्य अश्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री यांचा शिवसंकल्प अभियान दौरा असणार असुन शिवसेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यातील 45 जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प असुन त्यानुसार हे दोन्ही दौरे असणार आहेत.