धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांना मंदिरात दर्शनानंतर प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदीर संस्थानने घेतला आहे. आगामी काही दिवसात याबाबतची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त तुळजापुरात येतात त्यावेळी त्यांना इतर देवस्थानच्या धर्तीवर प्रसाद देण्याचा मंदीर संस्थानचा विचार होता त्यादृष्टीने उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने शिर्डी, तिरुपती, सिद्धिविनायक आदी देवस्थान यांचा दौरा केला त्यानंतर लाडू देण्याचा निर्णय घेतला आहेत.
भक्तांना किती लाडू द्यायचे, त्याची रक्कम, लाडू कुठे बनवायचे, त्याची वितरण व्यवस्था याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येणार असुन त्यानंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इतर देवस्थान प्रमाणे लाडू आता तुळजाभवानी देवस्थानचा ब्रँड बनणार आहे.