धाराशिव – समय सारथी
हिट अँड रन या वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी धाराशिव येथील जिल्हा मोटार मालक महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. नवीन कायद्याने चालक यांच्यावर अन्याय होणार असल्याने तो रद्द करावा अशी मागणी केली, कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलणाचा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष मैनोद्दीन पठाण यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको करण्यात आला. मोर्चात चालक-मालकसह ऑटो रिक्षा चालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने पारित केलेला कायदा हा कुठल्याही संघटनेला विचारत न घेता पारित केला असून तो ड्रायव्हरवर अन्याय करणारा असून तो रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहेत.
काल रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात टँकर चालक संपावर जाणार म्हणून पेट्रोल पंपावर देखील वाहन चालकाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आज देखील धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद असल्याने वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला आहे.
आता या संघटनाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा पुढील दोन दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे