3 दिवसांची पोलीस कोठडी – भंगार चोरीत तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना कोठडी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या लाखो रुपयांच्या भंगारचोरीत तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. कोर्टाने यलगट्टे यांना 10 एप्रिल पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, भंगार चोरी प्रकरण यलगट्टे यांना चांगलेच अंगलट आल्याचे दिसते.
भंगारचोरी प्रकरणात आम आदमी पार्टीचे ऍड अजित खोत यांनी या प्रकरणात लेखी तक्रार देत जबाब दिला आहे ज्यात भंगारचोरी ही 85 लाखांची असल्याचे नमूद केले आहे तर विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी यात तक्रार देत तारांकित प्रश्न उपस्थितीत केले होते.
लाखोंची भंगारचोरी अनं यलगट्टे यांची हेराफेरी या मथळ्याखाली दैनिक समय सारथी वृत्तपत्राने भंगारचोरीचे प्रकरण उघड केले होते.