जिल्हा परिषदेत लाच घेताना एकास अटक – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई
धाराशिव – समय सारथी
धाराशिव लाचलुचपत विभागाने कारवाई करीत जिल्हा परिषदेत एकास अटक केली आहे. बांधकाम विभागातील अभियंता असलेल्या सय्यद यांनी साडे सात हजार रुपयांची मागणी करुन 6 हजार लाच घेताना अटक केली. अंगणवाडीच्या कामाची तांत्रिक मान्यता आदेश देणे कामी ही लाच घेण्यात आली, शेकापूर या गावातील प्रति 11 लाख रुपये असे 3 कामे मंजुर होती. लाचलुचपत विभाग पुढील कारवाई करीत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम महेत्रे यांनी कामगिरी केली. सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, नागेश शेरकर, विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावसकर, सचिन शेवाळे, चालक दत्तात्रय करडे यांनी काम पाहिले.