कळंब बाजार समितीतील करोडोंचा भुखंड घोटाळा – 71 जणांना नोटीसा, चौकशी अहवाल
खुलासेनंतर गुन्हे नोंद होणार – भ्रष्टाचाराचा ठपका असलेली मंडळी निवडणुकीच्या रिंगणात
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जवळपास 250 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा प्रकरणी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर यांनी तत्कालीन सभापती, संचालक व प्रशासक अश्या 71 जणांना नोटीस पाठवली आहे. भुखंड घोटाळ्यातील चौकशी अहवालातील आरोपांचा तात्काळ लेखी खुलासा करावा अशी नोटीस पाठवली आहे. नोटीसीची मुदत संपत आली असुन त्यानंतर तात्काळ संबंधित दोषीवर गुन्हे नोंद होणार आहेत.
घोटाळ्यात अडकलेल्या व भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या तत्कालीन संचालकापैकी काही प्रमुख गाव पुढारी बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणातही उभी आहेत. या मंडळींना पुन्हा कोणता राजकीय पक्ष संधी देऊन कारभारी बनवणार ? याची जोरदार चर्चा आहे. काही भ्रष्ट संचालक यांच्यावर फौजदारी गुन्ह्यांसह कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. नियमबाह्य ले आऊट, पोटभाडेकरू, खुल्या जागेवर प्लॉट करुन विक्री, कृषी व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी वापर यासह अन्य मुद्दे या घोटाळ्यातील चौकशी अहवालात समोर आले आहेत.
तत्कालीन उपसभापती पांडुरंग गुणवंत कुंभार,शिवाजी दिगंबर कापसे,रामहरी शिंदे,बाळकृष्ण भवर,कांतीलाल बागरेचा, अनंत नानासाहेब लंगडे,अरुण बंडोबा चौधरी, दिलीपसिंह रामराजे देशमुख, तत्कालीन सभापती धनंजय वाघमारे, विजेंद्र चव्हाण व संजय विठ्ठल पाटील यांना नोटीस दिली आहे. तत्कालीन संचालक लक्ष्मण कोल्हे,शशिकांत दासराव फाटक, संजय त्रिंबक शेळके, अनंत बिक्कड, अनिल अडसूळ, अशोक तांबारे, गौतमराव शामराव मडके, तेजमल जैन, दगडू सोपान कोरे, नारायण वाघमारे, नीलकंठ लांडगे, पंडीत श्रीपती हौसलमल, पंडीत कोल्हे, पांडुरंग भराटे, प्रणव चव्हाण, प्रभाकर जाधव, प्रभावती थोरात, प्रवीण कापसे, बबन वाघमारे, बसलिंग लोखंडे, बाळासाहेब किसन खामकर, भगवान ओव्हाळ, भागवत नरहरी धस, मतीन शेख, मायावती तानाजी तौर, विलास चौधरी, विश्वभर मैदाड, विश्वनाथ पाटील, हनुमंत मते, विश्वनाथ नरवडे, शंकर नारायण करंजकर, शंकर यादव, श्रावण सावंत, संदीपान सावंत, हनुमंत आवाड, सतीश टेकाळे, सतीश टोणगे, सीताबाई गरड, सुभाष आल्टे, सुभाष चोंदे, सुरेश कसबे, सुरेश पाटील, सुवर्णमाला कदम, सोमनाथ बोंदर, हनुमंत माळी यांना नोटीस दिली आहे.
प्रशासक असलेले तत्कालीन व्ही व्ही गावडे, व्ही व्ही घुले, भागवत दासू चोंदे, सी पी बनसोडे, आर टी राजगुरू, उमेश विठ्ठल कुलकर्णी, गोकुळ नानासाहेब शेळके,एल एस सुरवसे,सचिव सूर्यकांत चव्हाण, कमलाकर कुलकर्णी, के एस बारकूल, जे टी थोरात, नानासाहेब यादव यांना नोटीस दिली आहे. या सर्व 71 जणांचे खुलासे आल्यावर घोटाळ्यात कोण कोण सहभागी याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असुन त्यानंतर फौजदारी कारवाई होणार आहे.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची सात एकर 38 गुंठे एवढी जमीन आहे .या जमिनीचे 600 प्लॉट करून विकण्यात आले आहेत. हे प्लॉट विकताना तत्कालीन संचालक मंडळ ,प्रशासक असलेल्या अधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर बसून कोणतीही अनामत रक्कम न घेता हे प्लॉट खिरापतीसारखे वाटले आहेत. कहर म्हणजे पणन संचालकाने बनवलेल्या लेआउट मध्ये छेडछाड करून ओपन स्पेस व रस्ता या जागेवरही प्लॉट तयार करण्यात आले व कोणताही ठराव न घेता किंवा पणन संचालकाची परवानगी न घेता हे प्लॉट विनामूल्य वाटप करण्यात आले. लेआउटमध्ये सोईनुसार बदल करून प्लॉट विक्री केली आहे तर ओपन स्पेस व रस्त्याची जागाही प्लॉट म्हणून विकली आहे.भाडेपट्टावरील प्लॉट सुद्धा थेट विक्री केले. महाराष्ट्र कृषी खरेदी व विक्री अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार कारवाईचा इशारा जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर यांनी दिला आहे.