यलगट्टे यांच्या संपत्तीची चौकशी करा – आमदार सुरेश धस यांनी लाचलुचपतकडे मागणी
धाराशिव – समय सारथी
भ्रष्टाचार प्रकरणी विविध गुन्हे दाखल असलेल्या निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली आहे.
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील भोकर, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच धाराशिव येथे पण भंगारचोरी, फसवणूक यासह विविध गुन्हे नोंद आहेत. या माध्यमातून यलगट्टे यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपसंपत्ती जमा केली आहे, काही संपत्ती जवळचे नातेवाईक यांच्या नावे केली असल्याची शक्यता आहे तरी चौकशी करावी अशी मागणी धस यांनी केली आहे.