धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कवड्याची माळ व कुंथलगिरी येथील पेढा याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे भौगोलिक मानांकन अर्थात जीआय प्राप्त झाले आहे.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरातुन अनेक भाविक कवड्याची माळ घेऊन जातात, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा भवानी कवड्याची माळ घालत होते.कवड्याच्या माळेला जिओग्राफिकल इंडीकेटर मानांकन प्राप्त झाल्याने एक नवीन ओळख मिळणार असुन जगभरात तुळजाभवानीची माळ जाणार आहे.
व्यवसाय वृद्धी, उत्पादन व विक्री याला मिळणार वाव असुन मार्केटिंगसाठी याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांची दिली. कवड्याच्या माळेला एक विशेष धार्मिक व पौराणिक महत्व असुन तुळजापूर येथे ही माळ बनवली जाते व भक्त देवीचा आशीर्वाद म्हणून ती गळ्यात घालतात तर काही जन ती परडीमध्ये ठेवून पुजा करतात. तुळजापूर येथे ही माळ बनवली जात असल्याने आता इतर ठिकाणी त्याची नक्कल करता येणार नाही अर्थात कॉपी राईट असणार आहे.
कुंथलगिरी या सिद्ध क्षेत्रात तयार होणाऱ्या खवा व पेढा याची वेगळी चव व ओळख असुन पारंपरिक पद्धतीने चुलीवरच्या भट्टीवर खवा व पेढा बनविला जातो. इथे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने जवळपास 300 च्यावर पेढा दुकाने असुन राज्यभर इथला खवा व पेढा विक्रीसाठी पाठवला जातो. आता मानाकंन मिळाल्याने आणखी गती येणार आहे.