मनोमिलन – छत्रपती संभाजी महाराज व मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची भेट
मुंबई – समय सारथी
स्वराज्य संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची काल मुंबई मंत्रालय येथील दालनात सदिच्छा भेट झाली. या भेटीमध्ये मराठा आरक्षण आणि इतर विविध विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या भेटीच्या निमित्ताने संभाजी महाराज व डॉ सावंत यांच्यातील राजकीय दुरावा काही अंशी कमी होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी मागील महिन्यात आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचा मतदार संघ असलेल्या भुम येथे ग्रामीण रुग्णालयात भेट देत आरोग्याचा पंचनामा करुन असुविधेची पोलखोल करीत राजीनामा मागितला होता. आरोप प्रत्यारोपामुळे या दोन नेत्यात राजकीय दुरावा वाढला होता मात्र आता मराठा आरक्षण बैठकीच्या निमित्ताने मनोमिलन झाल्याने दुरावा काही अंशी कमी होणार आहे.