तुळजापुर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तुळजाभवानी चरणी भक्तांनी 2009 पासून 2022 पर्यंत 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे ते आता वितळवले जाणार आहे.
या समितीतील सदस्य सोने वितळविन्याची नियमावली तयार करण्यासाठी शिर्डी देवस्थान भेटीला अभ्यास दौऱ्याला रवाना झाले असून येत्या महिन्यात नियमावली तयार होईल. तब्बल 14 वर्षानंतर देवीच्या तिजोरील सोने मोजण्यात आले होते त्यानंतर ते आता वितळवले जाणार आहे.
सोने चांदी दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर मंदीर संस्थानने प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी समिती नेमली असुन या समितीत 7 सदस्य असुन त्यात महंत, पुजारी मंडळाचे सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरातसह देशभरातून भाविक तुळजाभवानी दर्शनाला येतात तर तुळजाभवानी अनेक राजघराण्यासह लोकांची कुलदेवी आहे. भक्त नवसपुर्ती झाल्यावर तुळजाभवानी देवीला सोने चांदी याच्या वस्तू अर्पण करतात.
सोन्याचा हार,मंगळसूत्र, मणी, माळ, डोळे, बांगड्या यासह मुकुट अर्पण करतात तर चांदीचा पाळणा, समई, सिंहासन,ताट, वाटी याचा समावेश असतो तर काही जन आरोग्य चांगले राहावे यासाठी सोने-चांदी याचे डोळे, अवयव तिजोरीत टाकतात.