मराठा वनवास पायी यात्रा – आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई मंत्रालय यात्रा
मराठा समाज पुन्हा उतरणार रस्त्यावर – मुख्यमंत्री यांना सळो की पळो करू
धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून आता याच आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर ते मुंबई मराठा वनवास यात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधत मराठा समाज तुळजापुरातून आरक्षणाच्या मागणीचा एल्गार पुकारणार आहे एक महिनाभर मराठा समाजाचे कार्यकर्ते तुळजापूर ते मुंबई मंत्रालय पायी वनवास यात्रा काढून सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनाचं निमित्त सादर यात्रेचा समारोप केला जाणार असून मुंबईमध्येच आझाद मैदानावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार असल्याची भूमिका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. योगेश केदार, सुनील नागणे, प्रतापसिंह पाटील यांनी भुमिका स्पष्ट केली.
धाराशिव मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असून या यात्रेसाठी गावोगावी बैठका व चर्चासत्र आयोजित केली असून असंख्य मराठा कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी सहा मेला तुळजापुरात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली असून राज्य सरकारने हा विषय लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा याचे होणारे परिणाम भोगावे असा इशाराही सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
धाराशिव सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतली पुनर्विचार याचिका काल फेटाळली या निर्णयाचा सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत केल असून आता 50% च्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग या कोर्टाच्या निर्णयाने मोकळात झाला असून कायद्याच्या चौकटीत आवश्यक आहे ते राज्य सरकारने नव्याने करावे मुर्खात व येड्यात काढायचे धंदे राज्य सरकारने बंद करावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी करत राज्य सरकारवर टीका करत कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे सकल मराठा आरक्षण कृती समितीचे योगेश केदार यांनी ही भूमिका धाराशिवमध्ये मांडली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वांज बैठका घेऊ नयेत. 50 टक्के च्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांना सोळो की पळो करून सोडू असा इशारा मराठा आरक्षण कृती समिती समितीचे योगेश केदार यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाने काल मराठा आरक्षणाबाबत ची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटता आहे .मुख्यमंत्र्यांनी आज या संदर्भात राज्यातील मंत्र्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीलाच मराठा कृती समिती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. धाराशिव मध्ये पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली आहे