धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील अंनतछाया ऍग्रो प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनीकडुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांकडुन घेण्यात आलेल्या सोयाबीनचे पैसे मागील 3-4 महिन्यापासुन न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात ठिय्या करुन पैसे देण्यासाठी जाब विचारला मात्र नेहमी प्रमाणे आश्वासन पेक्षा काही मिळाले नाही. आज उद्या देऊ असे सांगत चालढकल केली जात आहे.
शेतकऱ्यांकडुन 5 हजार 100 प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केले मात्र त्यांचे पैसे दिले नाहीत, वारंवार मागणी करूनही पैसे न दिल्याने धैर्यशील उंबरे, मयुर खडके य, शहाजी पाटील यासह अन्य शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात ठिय्या दिला. यां कंपनीकडुन शेकडो शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याचे कळते. संबंधित शेतकरी कंपनी विरोधात तक्रार करुन कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहेत.