वाहतुक कोंडी करणाऱ्या वाहनावर कारवाई होणार – नागरिकचं आता काढणार फोटो, एम रमेश यांची संकल्पना
धाराशिव – समय सारथी
वाहतुक कोंडी करणाऱ्या वाहनावर कारवाई होणार असुन नागरिकचं आता फोटो काढून पोलिसांना पाठवणार आहेत.आयपीएस अधिकारी एम रमेश यांची ही संकल्पना असुन यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तर दूर होणारच आहे त्याबरोबर पोलिस यंत्रणावरील कामाचा ताण कमी होणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग कळंब तर्फे एक निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. कळंब शहरातील सर्व नागरिकांना, व्यापार्यांना सुचित करण्यात येते की, शहरातील आपले दुकान समोर किंवा घरासमोर एखादे वाहन वाहतुकीचा अडथळा करेल अशा रितीने बर्याच वेळापासून उभे असेल किंवा पार्किंग केले तर 8369907421 या नंबरचे व्हॉटस् अॅप वरती सदर वाहनाचा फोटो, गाडीचा नंबर स्पष्ट दिसेल अशा पध्दतीने काढून पाठवणे. आपण पाठवलेल्या फोटोवरुन नमुद वाहनावर शहर वाहतुक शाखेतर्फे ऑनलाईन पध्दतीने दंड आकारण्यात येईल जेणेकरुन शहरातील सर्व सामान्य नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळा होणार नाही असे उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश यांनी केले आहे.