वाशी – समय सारथी, शोएब काझी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी विनोद त्रिंबक गायकवाड यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गायकवाड यांनी स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चिठ्ठी लिहून गळफास लावून आत्महत्या केली आहे.
विशेष म्हणजे 2 दिवसापुर्वी मनोज जारांगे यांची वाशी येथे मराठा आरक्षणसाठी सभा झाली होती.
आत्महत्या चिट्ठी –
मी माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून मी आता आंदोलन करुन कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरून जात आहे, त्यामुळे मी फाशी घेतली.