मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व शरद पवार राहणार उपस्थितीत – आखाडा रंगणार
धाराशिव – समय सारथी
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान यंदा धाराशिव जिल्ह्याला प्रथमच मिळाला असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7. 30 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे. 36 जिल्ह्यातून 950 पैलवान 500 पंच 500 स्वयंसेवक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबांसे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
या स्पर्धेसाठी तब्बल 60 ते 70 हजार प्रेक्षकांना कुस्ती पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 19 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व 20 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची उपस्थिती राहणार आहे.
राज्यभरातून येण्यार्या कुस्ती प्रेमींसाठी धाराशिव जिल्हावासियांकडून व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरीसाठी विविध प्रतिष्ठित मान्यवरांची व नामांकित खेळाडूची नावे देण्यात आली आहेत.
पत्रकार परिषदेला स्पर्धेचे मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक अभिराम सुधीर पाटील, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव वामनराव गाते,धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर,माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे,साखरे अप्पा,गोविंद घारगे,शरद गवार,बबलू धनके,संजय पारवे,अनिकेत मोळवणे,सुंदर जवळगे,अनिल अवधूतसह नामांकित मल्ल व वस्ताद उपस्थित होते.