धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण अजुन मिळालेले नाही मात्र सरकारला जाहिरातबाजी करण्याची घाई झाल्याचे दिसत आहे. धोरण आखले आहे तोरण बांधण्याचे, मराठा आरक्षणाचे वचन पुर्ण करण्याचे असे म्हणतं पुनःश्च मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे अशी जाहिरातबाजी राज्यातील अनेक वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.
जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून जाहिराती प्रसिद्धी करण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी अनेक गावात साखळी उपोषण सुरु आहे तर काही तरुणानी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे समितीचे काम सुरूच आहे, सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही मात्र जाहिरातबाजी करीत करोडो रुपये उधळले गेले आहेत.
मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठा खासदार व आमदार यांना राज्यातील अनेक गावानी गावबंदी केली आहे.