धाराशिव – समय सारथी
कृषी आयुक्त या पदावर पुण्यात रुजू होताना खूप आनंदित आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि या महत्वाच्या क्षेत्रासाठी उत्कृष्ट काम करण्यासाठी वचनबद्ध आहे असे सांगत डॉ प्रवीण गेडाम यांनी पदभार स्वीकारला. आगामी एक महिना डॉ गेडाम हे कृषी विभागाचा अभ्यास करणार असुन त्यानंतर कृषी विभागाचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरा करणार अशी सूत्रांची माहिती आहे.
डॉ प्रवीण गेडाम यांच्या नियुक्तीने कृषी विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे, त्यांनी त्यांच्या कार्यातून व निर्णयाने जनमाणसाच्या मनात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.आहेत. राज्यात गेली दोन दशकाहुन अधिक डॉ गेडाम हे लोकउपयोगी कामाने प्रसिद्ध असुन एक दबंग अधिकारी अशी ओळख सर्वदूर आहे.
डॉ गेडाम हे मुळ नागपूरचे असुन 2002 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेडाम यांनी दापोली मध्ये प्रांतअधिकारी, जळगाव महापालिकेत आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिवचे जिल्हाधिकारी, पुणे येथे भुजल विकास यंत्रणेचे संचालक, सोलापूर जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आयुक्त, परिवहन आयुक्त,केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे स्वीय सहायक आणि केंद्रीय आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण या ठिकाणी काम केले होते आता ते राज्याचे कृषी आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.