नगर परिषदांना 738 कोटींचा निधी मंजुर – पालकमंत्री डॉ सावंत यांच्या प्रयत्नांना यश
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे धाराशिव जिल्हयातील नगर परीषद करीता 738 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री डॉ सावंत यांनी 26 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हयातील नगर परीषदाकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणेबाबत जिल्हाधिकारी व नगर परिषद जिल्हा प्रशासन अधिकारी यांना सुचना देत तात्काळ अहवाल सादर करणेबाबत निर्देशित केलेले होते.त्यानुसार प्रशासनाने भूम,परंडा,धाराशिव,तुळजापूर ,नळदुर्ग व उमरगा इत्यादी नगर परीषद यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर केला.
सदर प्रकल्प हा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत डीपी रस्त्याचे सिमेंट क्रॉक्रीट रस्ते व पक्की नाली पध्दतीने बांधकाम करणे अश्या स्वरुपाचे आहे. त्यानुसार सविस्तर अहवाल शासनाकडे दाखल झाल्यानंतर पालकमंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडे यासदंर्भात वारंवार पाठपुरावा केला. त्यांचे फलित म्हणून यापूर्वीच भूम व परंडा या नगरपरीषदांना अनुक्रमे 114.65 व 92.52 कोटी शासनाद्वारे मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित नगर परीषदा करीता 18 मे रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये धाराशिव नगर परीषद करीता 146.66 कोटी, तुळजापूर नगरपरीषद करीता 158 कोटी,नळदुर्ग नगरपरीषद करीता 97.67 कोटी, उमरगा नगरपरीषद करीता 128.52 कोटी असे एकूण 738 कोटीचे महत्वकांक्षी प्रकल्प मंजुर झाला आहे.