टेलिग्रामवर टास्क टाकून 15 लाखांची फसवणूक – धाराशिव सायबर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
धाराशिव – समय सारथी
टेलिग्रामवर टास्क टाकून 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धाराशिव सारख्या ग्रामीण भागात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढले असुन वेगवेगळी आमिष दाखवून ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. अनेक वेळा फसवणूक झालेली व्यक्ती पुढे येऊन पोलिसात तक्रार देत नसल्याने या टोळीचे मनोबल वाढत आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
तक्रारदार शिवानी उदयसिंह निंबाळकर यांच्या भावाचे व्हाट्स अँपवर मोबाईल क्रमांक 212695-910660 च्या धारकाने मॅसेज करुन व टेलीग्राम ग्रुपला ॲड करुन जास्त पैसे मिळतील असे आमीष दाखविले. टेलीग्राम ग्रुपवर वेगवेगळे टास्क देवून शिवानी यांना वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवण्याचे मेसेज देवून पैसे पाठवण्यास सांगितले. त्यांची व त्यांचे भावाची 14 लाख 97 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली यावरुन शिवानी निंबाळकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34, 66 (डी) मा.तं. कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.