वेबीनार – डॉ बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयाचा पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम
पर्यावरण संतुलन, प्रदूषण, परिणाम, उपाययोजना, संरक्षण व कायदे आणि जबाबदारीवर चर्चा
धाराशिव – समय सारथी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाराशिव येथील डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यात मायक्रो बायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा डॉ ए एम देशमुख यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संतुलन, प्रदूषण व त्याचे मानवी जीवनावर होणारे दूरगामी परिणाम, उपाययोजना, पर्यावरणाचे संरक्षण व त्याबाबतचे कायदे आणि जबाबदारी या कायदेशीर बाबीवर या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.
पर्यावरण प्रदूषणची कारणे आणि त्यावर उपाययोजना या विषयबद्दल देशमुख यांनी विधी कॉलेजच्या विद्यार्थी यांना महत्वाची माहिती दिली. जेथे ज्यावेळी जी गोष्ट नाही वापरायला हवी तिथे ती अती प्रमाणात वापरून पर्यावरण संतुलन बिघडविणे म्हणजे प्रदूषण पसरवणे ही सोपी व्याख्या सांगितली. जल,वायू आणि भू प्रदूषण हे महत्वाचे प्रदूषणाचे प्रकार आहेत आणि सध्या सर्वात भु प्रदूषण आहे कारण शेतकरी पीक लवकर येण्यासाठी रासायनिक खताचा मोठ्या खूप वापर करत आहेत त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे व हे अन्न खाल्याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.
शेतात एक वर्ष रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरल्यास 20 वर्षाकरीता जमिनीची सकसता कमी होते म्हणून जैविक खते वापरणे हा त्यावर उपाय राहील. प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्ण टाळायला हवा. कापडी पिशवी पर्याय आहे,प्लास्टिक बॉटलला काचेची, मातीची बॉटल पर्याय आहे. जास्तीत जास्त आजारी लोक पावसाळ्यात पडतात कारण दूषित पाणी असते तर पाणी उकळून पिणे हाच फक्त पर्याय आहे, आणि जल प्रदूषण टाळणयासाठी नैसर्गिक स्रोत असलेल्या साठ्यातील पाणी वापरावे आणि औद्योगिक घाण नदीमध्ये न फेकणे हा उपाय आहे.वायू प्रदूषण रोखणयासाठी बियोइथेनॉल सारखे इंधन वापरावे आणि सीएनजीचा पण वापर करावा.
निरंतर विकास गरजेचा आहे पण त्यासाठी वातावरणवर परिणाम नको, वातावरणची कार्यक्षमता सांभाळून प्रगती करा असे सांगितले. यात विद्यार्थी यांनी सहभाग घेतला, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य नितीन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली समन्व्यक प्रा पुनम तापडिया यांनी पुढाकार घेतला तर प्रा इकबाल शहा यांनी आभार मानले. वेबिनारमध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ देशमुख यांचा झाड देऊन सर्वांनी सत्कार केला.