तुळजाभवानी दर्शन – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव संपुर्ण मंत्रिमंडळासह तुळजापुरात येणार
भाजपचे देवानंद रोचकरी बीआरएस पक्षाच्या वाटेवर – पक्षात प्रवेश होणार ?
धाराशिव – समय सारथी
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) हे संपूर्ण मंत्रीमंडळासह तुळजापूर येथे येणार असुन ते विठ्ठल दर्शनानंतर 27 जुन रोजी 3.30 वाजता तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत.
सध्या बीआरएस पक्ष महाराष्ट्रात मोठ्या झपाट्याने वाढत असुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या तुळजापूर दौऱ्यात काही पक्ष प्रवेश होणार असल्याचे कळते. भाजपचे नेते देवानंद रोचकरी हे सुद्धा बीआरएस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे, काही दिवसापूर्वी त्यांनी हैद्राबाद येथे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली होती. तुळजापूर विधानसभा उमेदवारी जाहीर करण्याची अट रोचकरी यांनी घातली आहे त्यामुळे
26 व 27 जुन रोजी सोलापूर व धाराशिव जिल्हा असुन मुख्यमंत्री केसीआर हे पुर्ण मंत्रीमंडळ व महत्वाचे पदाधिकारी अश्या ताफासह 26 जुन रोजी सोलापूरला येतील त्यानंतर ते 27 जुन रोजी पंढरपूर जाऊन विठ्ठल दर्शन घेतील व नंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन हैद्राबादला जातील असा नियोजित दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 28 जुन रोजी पंढरपूर येणार असुन ते विठ्ठलाच्या महापुजेला उपस्थित राहणार आहेत.
आगामी निवडूका डोळ्यासमोर ठेवून बीआरएस पक्षाने विस्तार सुरु केला असुन वारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.