उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून त्यातील ८ जण हे उस्मानाबाद शहरातील सांजा रोड भागातील उस्मानपुरा ( काका नगर परिसर ) येथील एकाच घरातील आहेत तर कळंब शहरातील २ व एक रुग्ण शिराढोण या गावातील आहेत. उस्मानाबाद शहरात सापडलेले ८ रुग्ण हे नळदुर्ग येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले होते तर शिराढोण येथील रुग्णही कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णाची संख्या ८८ झाली असून त्यापैकी ३२ जण बरे झाले असून ५३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर ३ जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील १५ , लोहारा ६ व परांडा या तालुक्यात ११ रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात १७ रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका २ वाशी तालुका ४ व उस्मानाबाद २९ व तुळजापूर येथे ४ कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. यातील ३२ जण बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १ हजार ६६४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्यातील १ हजार ४०२ अहवाल निगेटीव्ह आले असून ८८ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली