उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल १२ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून रुग्णाची संख्या ११६ झाली असून त्यापैकी ५८ जण बरे झाले असून ५५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 3 जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली. सर्वाधिक ४१ रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात सापडले असून त्यापैकी २१ जण हे उस्मानाबाद शहरातील आहेत.
कळंब तालुक्यातील शिराढोण या गावात कोरोनाचे नवे ८ रुग्ण सापडले असून हे सर्व रुग्ण शिराढोण येथील जुन्या रुग्णाच्या संपर्कात आले आहेत तर हासेगाव येथे २ रुग्ण सापडले असून ते आंदोरा येथील रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्याच बरोबर पुणे येथून उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे आलेले २ रुग्ण हे पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात १२ रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला सुरुवात झाली असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे शुक्रवारी ४५ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी १२ पॉझिटिव्ह तर २९ निगेटिव्ह व ४ प्रलंबित राहिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील १६ , लोहारा ६ व परांडा या तालुक्यात ११ रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात २९ रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका ३, वाशी तालुका ४ व उस्मानाबाद ४१, तुळजापूर येथे ४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे १ हजार ८४० स्वॅब तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी १ हजार ५९३ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ११६ रुग्णांपैकी ५८ रुग्ण बरे झाल्याची बाब दिलासादायक असली तरी उस्मानाबाद शहर व शिराढोण गावात रुग्णाची संख्या वाढतच असून स्थानिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.