उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धक्कादायक बातमी असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. काकानगर येथील उस्मानपुरा भागातील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता, त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. नळदुर्ग येथील कोरोना रुग्णामुळे उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा या भागात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंताजनक स्तिथी आहे.
कोरोनाचा काल 4 था बळी गेला होता ,उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागातील तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला कॅन्सरचा आजार होता त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.या रुग्णाच्या थेट संपर्कात सर्व जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १४५ झाली असून त्यापैकी १०४ जण बरे झाले आहेत तर ३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर ५ जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील ४ व उमरगा तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू दर ३.४४ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर ७१.७२ टक्के असल्याची माहिती डॉ आदाटराव यांनी दिली.