आत्महत्या प्रकरण, 6 दिवस झाले तरी आरोपी फरार – भुम येथे रस्ता रोको
सुरेश कांबळे यांच्यावर एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई करा – पोलिस अधीक्षक यांच्याकडे मागणी
धाराशिव – समय सारथी
भूम शहरातील गालिबनगर येथील 30 वर्षीय युवक फैय्याज पठाण याने 21 जुन रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याअगोदर त्याने कोणाच्या त्रासामुळे आत्महत्या करत आहोत त्यांची नावे घेत एक व्हीडीओ सोशल मीडियामध्ये शेअर केला होता . आत्महत्येची घटना घडून ६ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकही आरोपी अटक करण्यात आलेला नाही. आरोपीला अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने भूम शहरातील गोलाई चौकात रास्ता रोको करण्यात आला.
दरम्यान धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्य आरोपी सुरेश कांबळे यांना अटक करुन त्यांच्यावर एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे. कांबळे यांची गुन्हेगारी प्रवृत्ती असुन त्यांच्यावर कायद्याचा वचक गरजेचा आहे. या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावं अशी मागणी केली. यावेळी मसुद शेख, खालील सय्यद,बाबा मुजावर, खलिफा कुरेशी,अफरोज पिरजादे,खादर खान, बिलाल तांबोळी, शेखर घोडके, वाजीदखान पठाण,बिलाल तांबोळी, अन्वर शेख, गयास मुल्ला,आयाज शेख, साबेर शेख,अतिक शेख, क्रांतीसिंह काकडे, रोहित बागल,रणवीर इंगळे, अजिंक्य हिबारे, धीरज मोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
आमचा कोणत्याही व्यक्तीस विरोध नाही तर मुस्लिम समाजाचा प्रवृत्तीस विरोध आहे अशी भूमिका दिसून आली. हा रास्ता रोको दोन तास सुरु होता. रास्ता रोको अगोदर गांधी चौक येथील मरकस मस्जिद येथून शांततेत घोषणा देत फेरी काढण्यात आली.या फेरीचे गोलाई चौक येथे रास्ता रोकोत रूपांतर झाले. भूम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी रास्ता रोकोसाठी उपस्थित असणाऱ्या समाज बांधवाना १० दिवसात आरोपी अटक करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले आहे त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
गुन्ह्याचा तपास सध्याच्या तपासी अधिकाऱ्याकडून काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा.नंदकुमार स्वामी हा डॉकटर नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करून कोट्यवधींची माया गोळा केली व शेतजमिनी विकत घेतली, हा पैसा कोठून आला त्याचा तपास करावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीवाद निर्माण करणारे आरोपीचे स्टेटस ठेऊन दहशत निर्माण करणाऱ्यावर कारवाई करावी , मयताच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी व आरोपी सापडत नसतील तर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर शेख,जलील पठाण, ऍड सिराज मोगल,माजी नगरसेवक तोफीक कुरेशी,अख्तर जमादार,बबलू बागवान,असिफ जमादार,वस्ताद मामू जमादार,सामियोद्दीन काजी,फिरोज शेख,गौस शेख,शाकीर शेख,गौस शेख,शब्बीर सापवाले,एजाज काझी,अन्नू कुरेशी,सरफराज कुरेशी,रहीम शेख,नय्युम पटेल,फारुख मोगल,रईस कुरेशी,समीर मोगल,फर्जंद काजी,आफताब शेख,कलीम मोगल,असलम बागवान,साद शेख,सोहेल मोगल,मुशीर शेख,शमीम शिकलकर,शहबाज पठाण,जावेद पठाण,तनवीर मोगल,हबीब फकीर,इम्रान पठाण,इरफान शेख,अम्मू पठाण,आदम शेख,जमशेद पठाण यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने हजर होता .