उस्मानाबाद:- समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ८ रुग्ण सापडले असून कोरोनाने २०० चा आकडा पार केला आहे. शनिवारी सापडलेल्या ८ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे तुळजापूर तालुक्यातील असल्याने तुळजापूर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे तर दोन रुग्ण हे उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागातील आहेत व एक जण उमरगा शहरातील बालाजीनगर येथून रहिवासी आहे तर एक रुग्ण वाशी येथील असून तो बाहेर देशातून आलेला आहे. कोरोना तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आलेल्या पैकी शनिवारी ६४ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यातील ५२ निगेटिव्ह तर ९ पॉझिटिव्ह व ४ प्रलंबित आहेत. तुळजापूर तालुकयातील हंगरगा येथे दोन रुग्ण, सलगरा येथे १ तर एक जण तुळजापूर शहरातील आहे. सलगरा येथील रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २०६ रुग्ण असून त्यापैकी १५९ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर ३८ जणांवर उपचार सुरू आहेत आजवर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर ४.३६ टक्के इतका आहे तर उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचा दर ७७.१८ टक्के असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.