उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असून १८ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात उस्मानाबाद तालुक्यातील ४तर उमरगा ८ जणांचा समावेश आहे तसेच परंडा तालुक्यातील ४ रुग्णांचा व भूम तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद व उमरगा शहराला हळूहळू कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.
दिनांक १३/७/२० रोजी सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद येथून २०२ स्वाब नमूने तपासणीसाठी स्वा.रा.तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील १७ रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १८५ नेगटीव्ही आले आहेत .त्याचा अहवाल खालील प्रमाणे आहे.
आज उस्मानाबाद तालुक्यातील चार रुग्ण सापडलेली माहिती २ रुग्ण थोडसरवाडी येथील तर १रुग्ण तडवळा व एक रुग्ण उस्मानाबाद जेल मधील आहे
उमरगा तालुका येथील ८रुग्ण त्यापैकी ६ रुग्ण उमरगा शहरातील आहेत १रुग्ण तुरोरी व १ गुजोटी येथील आहे
तसेच परंडा तालुक्यातील ४ रुग्ण हे परंडा शहरातील आहेत
तर भूम तालुक्यातील दोनपैकी एक रुग्ण राळे सांगवी येथील आहे
एक रुग्ण भूम शहरातील असून तो सोलापूर येथे उपचार घेत आहे त्यामुळे आज उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १८ रुग्णांची कोरोना बधिता मध्ये भर पडली आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे तसेच नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.
*आज एकूण १८ रुग्णांची बाधितामध्ये भर पडली आहे.*
आज दिनांक १४/७/२०२०रोजी संध्याकाळी उस्मानाबाद शहरातील महादेव गल्ली राहणाऱ्या ५९ वार्षीय पुरुषाचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे.
अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ४३६ रुग्ण असून त्यापैकी २६१ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर १५७ जणांवर उपचार सुरू आहेत आजवर १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर ४.१२ टक्के इतका आहे तर उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचा दर ५९.८६ टक्के आहे.