उस्मानाबाद – समय सारथी
गावची सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे गाव कारभारी आता ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी पुढाकार घेताना काही गावात दिसून आले .उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 पैकी 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत उमरगा तालुक्यातील आहेत तर कळंब, परंडा, लोहारा या तालुक्यात प्रत्येकी 5 , उस्मानाबाद तालुका 3, तुळजापूर 4 , भूम तालुका 7 व वाशी तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिली.
उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून त्यात भिकार सांगवी,मुळज,जकेकुर, जकेकुरवाडी,चिंचकोटा, बाबळसुर, कोळसुर गु,एकोंडी,पळसगाव व मातोळा या गावांचा समावेश आहे. लोहारा तालुका 5 बिनविरोध ग्रामपंचायत असून त्यात आरणी, मार्डी,राजेगाव, तावशिगड व धानुरी हे आहेत. भूम तालुक्यातील 7 बिनविरोध ग्रामपंचायत असून त्यात उमाचीवाडी, बेदरवाडी, नान्नजवाडी, सोन्नेवाडी,वरूड, बागलवाडी व गोलेगाव यांचा समावेश आहे.
परंडा तालुक्यातील देवगाव , खंडेश्वरवाडी, कपिलापुरी, उंडेगाव व भोंजा या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा, वाकडी, आडसुळवाडी, लासरा व दुधाळवाडी या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता, डकवाडी व पोहनेर या 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर तुळजापूर तालुक्यातील बारुळ,वानेगाव,अमृतवाडी व पिंपळा खुर्द ही गावे बिनविरोध झाली आहेत. वाशी तालुक्यातील एकमेव सारोळा ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे 388 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत 3 लाख 13 हजार 326 स्त्री , 3 लाख 60 हजार 659 पुरुष व 5 इतर असे 6 लाख 73 हजार 990 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता या गावातील 9 सदस्य असलेली ग्रामपंचायत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत बिनविरोध काढली आहे. गावचा विकास करण्यासाठी व गावात तंटे होऊ नये यासाठी ही मंडळी विकासाचा ध्यास घेऊन एक झाली आहेत , धुत्ता ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने त्यानी एकमेकांची गळाभेट घेत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
उस्मानाबाद जिल्ह्यात 388 ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा पेटला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात दैनंदिन वापरात असलेल्या वस्तू व मतदारांच्या सहज लक्षात राहतील अशा चिन्हाना सर्वाधिक पसंदी आहे. कपबशी , कपाट , कटली , ग्लास , जग , फुगा या चिन्हाना जास्त पसंदी उमेदवारांनी दिली