20 वर्ष सक्तमजुरी व 50 हजार दंडाची शिक्षा – अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरणात कोर्टाचा निकाल
धाराशिव – समय सारथी
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरीच्या शिक्षेसह 50 हजार रुपयांचा दंड धाराशिव जिल्ह्यातील कळंब कोर्टाने सुनावला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर के राजेभोसले यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिद्धार्थ खंदारे या आरोपीस शिक्षा सुनावली. विशेष शासकीय अभियोकता सचिन सूर्यवंशी यांनी या प्रकरणात सक्षमपणे बाजू मांडली. या प्रकरणात वैद्यकीय अहवाल, डीएनए अहवाल व पीएसआय चैनसिंग गुसिंगे यांनी केलेला तपास महत्वाचा ठरला.
कळंब तालुक्यातील एका गावात एका शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या आरोपीने एका मुलीवर सलग अत्याचार केला त्यातून ती मुलगी गरोदर राहिली त्यानंतर हे प्रकरण समोर आले व पोस्को आणि बलात्कार कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मुलगी कधीही शाळेत न गेल्याने व पर्याप्त कागदपत्रे नसल्याने वैद्यकीय तपासणी करुन वयाचा अल्पवयीन असल्याचा अहवाल दिला त्यानंतर गर्भाच्या अंशचे जणुकीय माता पीडिता व पिता आरोपी असल्याचे डीएनए अहवालात समोर आले.
सुरुवातीला हे प्रकरण अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगताप यांच्यासमोर चालले त्यावेळी ते राजेभोसले यांच्याकडे वर्ग झाले यात शासकीय अभियोकता म्हणून आशिष कुलकर्णी व सचिन सूर्यवंशी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एस व्ही माळी, बी पी शिंदे यांनी काम केले.
कोर्टाने कलम 376 (3) बाललैंगिक अत्याचार अंतर्गत 20 वर्षाची शिक्षा सुनावली.