धाराशिव – समय सारथी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत, उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असे स्पष्ट आदेश देण्यात आली. हेच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतरही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.











