धाराशिव – समय सारथी
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे शिवसेना पक्षाचे एबी फॉर्म होते याची कबुली शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा ढोकी येथील सभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार राणा पाटील हे भाजप, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट चालवीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता तो आता तंतोतंत खरा ठरला आहे.
शिवसेनेचे राज्य पदाधिकारी अविनाश खापे पाटील व धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शिवसैनिक म्हणुन घ्यायला लाज वाटते असे म्हणत साळवी यांना जाब विचारला तर साळवी यांनी हे सगळे अजित पिंगळे यांच्या अधीपत्याखाली संमतीने झाले असे म्हणत साळवी यांनी पोलखोल केली.
हाताची 5 बोटे तुपात, यांचे नशीब बलवत्तर आहे. भाजप तेच चालवतात, राष्ट्रवादीशी नाते गोते, शिवसेनेतील गद्दारांचा एक गट त्यांच्या खिशात, ह्यांचे सगळे एबी फॉर्म यांच्याकडे मग राहिला कोणता पक्ष ? काँग्रेसचे हस्यास्पद झाले आहे. वंदनीय मधुकरराव चव्हाण यांनी 30 वर्ष एकट्याने हा किल्ला लढवला मात्र कशामुळे ते सरेंडर झाले हे त्यांनाच विचारा. युती की आघाडी हा विषय राहिला नाही. 5 पक्ष घेऊन हा एकटा माणुस चालतो, तो कुठल्याच पक्षाचा नसतो कारण गद्दारी ही रक्तता आहे, तत्व व नियत यांचा अभाव असलेली ही माणसे असुन त्यांना विचार नाही. महायुती सत्ता गेली किंवा अडचण आली व महाविकास आघाडी किंवा नवीन राजकीय समीकरण आले की पाहिली उडी मारणारे हे बेडूक असेल अशी टीका सावंत यांनी तेरणा कारखाना येथील मेळाव्यात केली होती.
शिवसैनिक म्हणुन घ्यायला आम्हाला लाज वाटते, तुम्ही दिवसभर शिवसैनिकांशी चर्चा करता व रात्री आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत बोलणी करता. शिवसेनेचे पक्षाचे एबी फॉर्म आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी वाटले त्यामुळे आम्हाला शिवसैनिक म्हणुन घ्यायला लाज वाटते असे अविनाश खापे म्हणाले त्यावर संपर्कप्रमुख राजन साळवी म्हणाले की हा विषय मला माहिती आहे. त्यांनी एक प्रकारे कबुली दिली.
धाराशिव कळंब हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आणि असे काय 4-6 महिन्यात घडले की शिवसेना कमी झाली आणि राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हातात गेली. उमेदवारी व जागा वाटपा वेळी अजित पिंगळे तिथे होते, अजित पिंगळे विधानसभेचे उमेदवार होते, यांच्या आधीपत्याखाली हे सगळे झाले.पालकमंत्री यांच्या समोर तुमचे खरे खोटं करतो असे साळवी म्हणाले. या सगळ्या बाबीचे खापर त्यांनी पिंगळे यांच्यावर फोडले.
अजित पिंगळे हे 4 वेळेस पराभुत उमेदवार आहेत, ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा माणूस आहे, त्यांनी सगळी सूत्र त्यांच्याकडे दिल्याचा आरोप खापे यांनी केला. पक्षात हुकूमशाही सुरु झाली असुन राणाजगजीतसिंह पाटील यांना बळी पडल्याचा आरोप केला. युती म्हणुन आमची विधानसभा मतदार संघ निहाय राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बरोबर बैठक झाली, ते मी नाकारत नाही, त्यावेळी माजी आमदार उपनेते ज्ञानराज चौगुले, अजित पिंगळे तिथे होते. उपनेत्यांच्या अधीपत्याखाली हे झाले असे साळवी म्हणाले.











