धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषद येडशी गटातून शिवसेना उबाठाचे अधिकृत उमेदवार देवदत्त मोरे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला असुन त्यांना निवडणुक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी दिलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
धाराशिव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता येडशी जिल्हा परिषद गटातून देवदत्त भागवत मोरे रा. कसबे तडवळे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून अधिकृत नामनिर्देशनपत्र सादर केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी जिप आणि पंस सार्वत्रिक निवडणूक 2026 यांच्या समोर उमेदवारी अर्जाची छाननी ठेवण्यात आली होती.
भाजपा उमेदवार संजय महादेव लोखंडे रा. येडशी व सहदेव विश्वनाथ करंजकर रा. कसबे तडवळे यांनी देवदत्त मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांना साल सन 2001 नंतर 2 पेक्षा जास्त मुले असल्याचा आक्षेप सादर करून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणेबाबत आक्षेप सादर केला होता.
सदर आक्षेप अर्जाची सुनावणी ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. देवदत्त मोरे यांच्या वतीने शिवसेना उबाचे कायदेशीर सल्लागार प्रसिद्ध विधिज्ञ ऍड रमेश शहाजी मुंढे यांच्या मार्फत हजर झाले व हजर होवून आक्षेप अर्जास रितसर म्हणणे सादर केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 23 जानेवारी रोजी सदर अर्जावर अंतिम सुनावणी ठेवण्यात आली होती.
सदर सुनावणी वेळी देवदत्त मोरे यांच्या वतीने अॅड रमेश मुंढे यांनी जिल्हा परिषद तरतुदीच्या अनुषंगाने तसेच मा. उच्च न्यायालय यांचे विविध न्याय निर्णयाचा आधार घेवून जोरदार युक्तिवाद केला, निवडणूक अधिकारी यांनी सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून आक्षेप अर्जदार यांनी दाखल केलेला आक्षेप पुराव्यानिशी सिद्ध केला नाही असा निष्कर्ष नोंदवून आक्षेप अर्ज फेटाळला व देवदत्त मोरे यांचा नामनिर्देशन अर्ज वैध ठरवला.
सदर प्रकरणी ऍड रमेश मुंढे यांनी कामकाज पाहिले त्यांना ऍड प्रशांत लोंढे, ऍड सचिन अंबर, ऍड अजिंक्य मगर, ऍड संघर्षदिप वाघमारे, व अक्षय धुमाळ यांनी सहकार्य केले.











