धाराशिव – समय सारथी
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांनी धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील देवळाली येथे गांजा शेतीचा पर्दाफाश करीत अमली पदार्थ लागवड करणाऱ्या विरोधात कारवाई केली.
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजी नगर कृती विभाग यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, देवळाली ता. भूम जि. धाराशीव येथील शेतजमीनीत गांजाच्या झाडाची (कॅन्बीस प्लांटची) अवैधरित्या लागवड करण्यात आली आहे. त्यावरून गोकुळदास रावसाहेब हावळे वय 50 वर्ष यांचे शेतात छापा टाकून कारवाई केली असता अवैधरित्या लागवड केल्याचे समोर आले. लहान मोठे मिळून 52 झाडे असुन 16 किलो वजन निघाले.
सहायक पोलिस उप निरीक्षक वाहेद मुल्ला यांचे फिर्यादीवरून कलम 8 (क), 20 (ब), 11 (ब) एनडीपीएस कायदा 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी गोकुळदास रावसाहेब हावळे यास आटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ही अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत,पोलीस अधिक्षक अजित टिके, डिवायएसपी गुलाबराव पाटील,.सपोनि विजय जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि दिपाली पाटील, के.डी. संपकाळ, सपोउपनि वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वरं चव्हाण, अम्रपाली सूर्यवंशी यांनी केली आहे.
युवा वर्ग नशेचे आहारी जात असल्याने असे प्रकाराचे कोणतेही नशेचे गांजा, ड्रग्ज अमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे लागवड करणारे गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी आमली पदार्थ विरोधी टास्कं फोर्सची (ANTE) स्थापना केलेली असुन जनतेने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.











