धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाली असुन येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. बहुतांश ठिकाणी महायुती असुन उमेदवारी अर्ज मागे घ्याच्या दिवशी सर्व काही कळेल असे म्हणत महायुतीचा सस्पेन्स कायम ठेवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, महायुती करावी. विधानसभा निहाय जे काही योग्य वाटते ते करावे असे त्यांनी सांगितले त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. अधिकांश ठिकाणी शिवसेना – भाजप एकत्र लढणार आहे असे ते म्हणाले. लवकरच महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करू असे आमदार पाटील म्हणाले.
योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी सांगु, मी पेपर फोडणाऱ्या पैकी नाही, पूर्वीच काही गोष्टी सांगितल्या तर ते योग्य ठरणार नाही असे म्हणत त्यामुळे अर्चना पाटील यांच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवला
केंद्रात व राज्यात महायुतिचे सरकार असुन प्रलंबित प्रकल्प मार्गी लागतील, निधी येऊन विकास होईल असे ते म्हणाले. अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असुन त्यांची माहिती येत्या आठवड्यात सविस्तर सांगू असे ते म्हणाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ऍड नितीन भोसले,नेताजी पाटील, सुरेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.












