वैद्यकीय आणीबाणी – उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात रुग्णांचे हाल तर नातेवाईकांची तारांबळ
वाढता संसर्ग ठरतोय घातक , वॉर्डात नातेवाईकांचा खुलेआम वावर
रेमडीसीवीरचा तुटवडा – जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयांत इंजेक्शन देणे केले बंद
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वैद्यकीय आणीबाणी लागल्या सारखी स्तिथी निर्माण झाली आहे. उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात स्तिथी गंभीर झाली असून रुग्णांचे बेड न मिळाल्याने हाल होत आहेत तर नातेवाईकांची बेड , औषध उपलब्ध करून देताना तारांबळ उडत आहे. रोजचा वाढता आकडा व संसर्ग ठरतोय घातक ठरत असून बंदी असतानाही कोरोना वॉर्डात अनेक नातेवाईकांचा खुलेआम वावर जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे. कोरोना वॉर्डात रुग्णांना भेटून हे लोक बाहेर फिरत असल्याने ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना वाढत असून आज सोमवारी 680 नवे रुग्ण सापडले तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 581 झाली आहे त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात बेड कमी पडत आहेत. उस्मानाबाद शहर कोरोना हॉटस्पॉट झाले असून शहरातील रुग्णालयात 2 हजार 757 रुग्ण क्षमता होती मात्र केवळ 28 बेड शिल्लक राहिले आहेत तर 11 सीसीसी कोविड केअर सेंटरमध्ये 1 हजार 60 क्षमता आहे त्यात 704 जागा शिल्लक आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली .
जिल्ह्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा होता मात्र जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयांत इंजेक्शन देणे सुरू केल्याने काही काळ दिलासा मिळला होता मात्र आता जिल्हा शासकीय रुग्णालयात इंजेक्शन साठा शेवटच्या टप्प्यात संपत आल्याने आता जिल्हा रुग्णालयातुन खासगी रुग्णालयात इंजेक्शन देणे बंद केल्याची माहिती डॉ मुल्ला यांनी दिली.