कहर – उस्मानाबाद जिल्ह्यात आज 613 रुग्ण ,15 मृत्यू
जिल्ह्यात 5 हजार 156 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद :
उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन 613 रुग्ण सापडले व 15 जणांचा मृत्यू झाला तर 383 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सक्रिय रुग्णाची संख्या 5 हजार 156 झाली आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत.
आज झालेल्या 15 मृत्यूमध्ये 3 मृत्यू हे 24 तासाच्या आत रुग्णालयात भरती केल्यानंतर झाले आहेत तर 6 मृत्यू हे 48 तासात, 1 मृत्यू 72 तासाच्या आत तर 4 मृत्यू हे 72 तासांच्या नंतर झाले आहेत त्यामुळे कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 524 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 89 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज 15 रुग्णांचा मृत्यू झाला
असून *कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 657 झाली आहे*.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 388 रुग्ण सापडले तर तुळजापूर 33, उमरगा तालुक्यात 30 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5 हजार 156 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे.उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
*उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 79 हजार 586 नमुने तपासले त्यापैकी 27 हजार 080 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 20.62 टक्के आहे. जिल्ह्यात 21 हजार 276 रुग्ण बरे झाले असून 79.94 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 657 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.43 टक्के मृत्यू दर आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 388 रुग्ण , तुळजापूर 33, उमरगा 30, लोहारा 31, कळंब 45 , वाशी 29, भूम 30 व परंडा तालुक्यात 27 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239
30 मार्च – 242
31 मार्च – 253
01 एप्रिल – 283
02 एप्रिल – 292
03 एप्रिल – 343
04 एप्रिल – 252
05 एप्रिल – 423
06 एप्रिल – 415
07 एप्रिल – 468
08 एप्रिल – 489
09 एप्रिल – 564
10 एप्रिल – 558
11 एप्रिल – 573
12 एप्रिल – 680
13 एप्रिल – 590
14 एप्रिल – 613