मृत्यूचे तांडव – कोरोनाने आज 23 मृत्यू तर 580 नवीन रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आज घातकवार , 5 हजार 696 सक्रिय रूग्ण
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा वार घातक वार ठरला आज कोरोनाने मृत्यूचे तांडव घालत 23 जणांचा बळी घेतला. आज कोरोनाचे नवीन 580 रुग्ण सापडले व 23 जणांचा मृत्यू झाला तर 291 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सक्रिय रुग्णाची संख्या 5 हजार 696 झाली आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 518 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 62 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज 23 रुग्णांचा मृत्यू झाला
असून *कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 691 झाली आहे*.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 300 रुग्ण सापडले तर तुळजापूर 39, उमरगा तालुक्यात 68 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5 हजार 696 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे.उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
*उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 84 हजार 449 नमुने तपासले त्यापैकी 28 हजार 424 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 21.67 टक्के आहे. जिल्ह्यात 22 हजार 037 रुग्ण बरे झाले असून 78.82 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 691 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.37 टक्के मृत्यू दर आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 300 रुग्ण , तुळजापूर 39, उमरगा 68, लोहारा 26, कळंब 58 , वाशी 36, भूम 20 व परंडा तालुक्यात 33 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा