मुंबई – समय सारथी
नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्र पाठवून सदर बाब स्पष्ट केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने तातडीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्विकारले जावे अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.











