धाराशिव – समय सारथी
वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव पोलिसांनी छापा टाकत दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात घेतले आहे तर तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे.
सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील तुगाव मोड येथील एका धाब्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून धाड टाकली. या प्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी आर. एस. गायकवाड करत आहेत.











